CET EXAM ONLINE FORM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत शासन निर्णय दिनांक 28 मे 2021 व दिनांक 24 जून 2021 नुसार इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामायिक प्रवेश परीक्षेचे सी. ई. टी. (CET) चे आयोजन करण्यात येत आहे. सदर परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून आवेदन पत्र भरण्याची सुविधा 20/7/2021 रोजी सकाळी 11: 30 पासून उपलब्ध करुन देण्यात आली होती, परंतु काही तांत्रिक कारणास्तव आवेदन पत्र सुविधा 21/07/2021 पासून बंद ठेवण्यात आली होती. यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात प्रवेशा संदर्भात अनेक प्रश्न पडले होते. पण आता विद्यार्थ्यांना सी. ई. टी. (CET) चे फॉर्म भरता येणार आहेत.
इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणार्या सामायिक परीक्षेचे (CET) आवेदनपत्रे सोमवार दिनांक 26/7/2021 रोजी दुपारी 3 पासून ऑनलाईन पद्धतीने या संकेत स्थळावरून भरण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर सुविधा दिनांक 02/08/2021 अखेर रात्री 11:59 पर्यंत उपलब्ध असेल
फार्म कसा भरावा
या
परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने https://cet.11thadmission.org.in या संकेत स्थळावर आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे.
आपल्याला लॉगीन करण्यासाठी दहावीचा सीट नंबर व आईचे
नाव प्रथम टाकावे लागेल.
आधार
कार्ड, आपले
नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल
नंबर इत्यादी सर्व माहिती तपासून पहावी लागेल.
ईमेल
आयडी असल्यास टाकावा.
परीक्षेचे
माध्यम विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी चा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी,गणित
व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल तर सामाजिक शास्त्र, इतिहास
व राज्यशास्त्र, भूगोल या विषयासाठी विद्यार्थ्यांना एक माध्यम निश्चित
करावे लागेल.
सदर
परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या कायमच्या निवासस्थानाचा पत्ता
नुसार परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा
विभाग वार्ड निश्चित करावा लागेल.
ज्या विद्यार्थ्यांनी 20/07/2021 ते 21 /07/ 2021 या कालावधीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून सामायिक प्रवेश
परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशील
पूर्वीचा अर्ज क्रमांक या आवेदन पत्र भरताना नोंदविला मोबाईल क्रमांक टाकून आपली माहिती संकेतस्थळावर
पाहता येईल.
ज्यांनी परिपूर्ण अर्ज सादर केलेला आहे त्यांना पुन्हा अर्ज
करण्याची आवश्यकता नाही मात्र ज्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा
उमेदवारांनी आपला तपशील संकेतस्थळावर पाहून तो पूर्ण करावा किंवा जर आपला तपशील
मिळत नसेल तर नव्याने अर्ज करावा.
सामायिक प्रवेश परीक्षा संदर्भात विद्यार्थी, पालक
व अन्य संबंधित घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत हेल्पलाइन सुविधा
उपलब्ध करून देण्यात आली आहे यावरून पालक, विद्यार्थी आपल्या शंकांचे निरसन करू शकतात.
0 Comments