शरीरातील बी12 वाढवण्यासाठी तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स
1. मासांहारामध्ये व्हिटॅमीन बी 12 चं प्रमाण सर्वात जास्त असतं. विविध प्रकारचे मासे, अंड्याचा पिवळा बलक, चिकन यामध्ये व्हिटॅमीन बी 12 चं प्रमाण अधिक असतं. 2. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून व्हिटॅमीन बी 12 मिळण्यास मदत होते. मशरुम, बदाम किंवा सोयाबीनचं दूध तसचं मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा. 3. शरीरामध्ये व्हिटॅमीन बी 12 चांगल्या प्रकारे शोषले जावेत, यासाठी कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असणं गरजेचं आहे. 4. व्हिटॅमीन बी 12 शोषण चांगल्या प्रकारे शोषले जावेत, यासाठी आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. 5. भरपूर पाणी प्यायल्याने व्हिटॅमीन बी 12 चं शरीरात चांगल्या प्रकारे शोषण होण्यास मदत होते. 6. व्हिटॅमीन बी 12 च्या कमतरतेमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेचं कार्य बिघडतं. त्यामुळे नैराश्य, विस्मरण, निद्रानाश यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
0 Comments