पॅन कार्ड मधील बदल व आधार लिंक.

आज पॅन कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे अनिवार्य आहे. पॅन कार्ड फक्त कर भरणाऱ्यांसाठीच नाही तर सामान्य नागरिकांकडे देखील असणे आवश्यक आहे. कार लोन, होम लोन असेल अथवा कोणताही मोठा व्यवहार असेल तर तेथे पॅन कार्ड देणे गरजेचे असते. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर नवीन पॅन कार्डसाठी ऑफलाइन अथवा ऑनलाइन देखील अर्ज करता येतो. तसेच पॅन कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करण्यासाठी किंवा हरवले असल्यास नवीन पॅन मिळण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
पॅन कार्डमधील चुका दुरूस्त करण्याची आवश्यकता:- पॅन कार्डमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करणे आवश्यक आहे. काही वेळेस नाव, जन्मतारखेमध्ये चुक होऊ शकते. अशा वेळेस त्या चुका दुरूस्त करणे गरजेचे आहे. जर पॅन कार्डमध्ये एका अक्षराची जरी चुक असेल तर पॅन कार्ड अमान्य ठरू शकते.
पॅन कार्ड मधील चुक अशी करा दुरूस्त !
पॅन कार्डमध्ये बदल करण्यासाठी किंवा नवीन बनविण्यासाठी NSDL अथवा UTITSL वेबसाइट वर जावे लागेल. – वेबसाइटवरील पॅन कार्ड चुका दुरूस्तीसाठी असलेल्या लिंकवर क्लिक करावे. – त्यानंतर पुढील पेजवर तुमची माहिती मागितली जाईल. तुम्हाला ज्या पॅन कार्डमध्ये बदल करायचा आहे तो पॅन नंबर भरणे आवश्यक आहे. – समोर (*) चिन्ह असलेली माहिती भरणे आवश्यक आहे. – ज्या माहितीमध्ये बदल करायचा आहे, त्याच्या समोरील बॉक्समध्ये टिक करावे लागेल. जर पॅन कार्ड पुन्हा बनवायचे असेल तर कोणत्याही बॉक्समध्ये टिक करण्याची गरज नाही. – बदल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन जमा करावी लागतील. – सर्व माहिती जमा केल्यानंतर त्यासंबंधीची पोच (Acknowledgement) मिळेल. यामध्ये १५ आकडी युनिक Acknowledgement Number असतो. हा नंबर संभाळून ठेवणे गरजेचे आहे. – या नंबरवरून पॅन कार्ड कोणत्या प्रोसेसमध्ये आहे ते ट्रॅक करता येते.

जर पॅन कार्डमध्ये काही चुका असतील अथवा पॅन कार्ड हरवले असेल, तर दुसरे पॅन कार्ड काढण्याची चुक करू नये. यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. जर एका पेक्षा अधिक पॅन कार्ड असेल तर, भारतीय आयकर आधिनियम, १९६१ च्या कलम २७२/ब नुसार १० हजार रूपयांचा दंड भरावा लागू शकतो. दोन पॅन कार्ड असतील तर पॅन कार्ड ऑनलाइन देखील जमा करता येते. https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंकवर दुसरे पॅन कार्ड जमा करता येईल.
आधार- पॅन लिंक करणे अनिवार्य !
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आयकर रिटर्न्स भरण्यासाठी आधार बरोबर (PAN) परमनंट अकाऊंट नंबर जोडणे अनिवार्य आहे. त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना न जोडल्यास संबंधितांचे पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. आधार कार्ड पॅन कार्डशी सलंग्न होण्याची अंतिम मुदत जवळ आलेली असताना अद्याप पन्नास टक्के पॅनकार्डधारकांनी हि प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सीबीडीटीचे प्रमुख सुरेश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने आजपर्यंत ४२ कोटी पॅनकार्डांचे वितरण केले आहे आणि त्यापैकी फक्त २३ कोटी पॅनकार्डधारकांनीच आतापर्यंत आधार-पॅनकार्डशी संलग्न केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘आधार- पॅन कार्ड संलग्न ‘ या निर्णयामुळे बोगस पॅनकार्डधारकांना ओळखणे सोपे जाणार आहे. आयकर रिटर्न्स भरण्यासाठी आणि पॅनचे वितरण करण्यासाठी आधार अनिवार्य राहील. सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या देशात ७.५ टक्के आर्थिक विकास दर केवळ १.५ लाख रिटर्न्स दराने १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न दर्शवित आहे. ही एक अतिशय खेदजनक बाब आहे की, ‘या देशात जीडीपी, खर्च खुप वाढत आहे, सर्व 5 स्टार हॉटेल्स भरले आहेत , परंतु जर तुम्ही कोणाला विचारले तर किती लोक १ कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा देत आहेत ?- खरचं ही खूप खेदजनक बाब आहे. आयकर कायद्याच्या कलम १३९ AA (२) मध्ये असे म्हटले आहे की, १ जुलै २०१७ रोजी प्रत्येक व्यक्तीला पॅन मिळाल्यास आणि आधार प्राप्त करण्यासाठी पात्रता असलेल्या व्यक्तीस आपला आधार क्रमांक कर अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. यावर्षी आतापर्यंत ६.३१ कोटी रिटर्न्स दाखल केले गेले आहेत, जे गेल्या वर्षी दाखल केलेल्या ५.४४ कोटी व्यक्तींपेक्षा जास्त आहेत. विभागाने आतापर्यंत ९५ लाख नवीन करदाते जोडले आहेत.
एकदा आधार – पॅन लिंक केले की, आधार वापरून तुम्ही आयकर रिटर्न्सची ई-पडताळणी करू शकता आणि दोन कार्डे जोडून तुम्हाला आयकर विभागाकडे आपली आयकर पावती जमा करावी, लागणार नाही. आधार कार्डसह पॅन कार्ड जोडण्याचा आणखी एक महत्त्वाचा हेतू म्हणजे दोघेही ओळखपत्र आहेत जे नोंदणी सत्यापनासाठी आवश्यक असलेला ओळखीचा पुरावा म्हणून काम करतात. पॅनला आधार लिंक करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे कारण आहे की, सरकारची फसवणूक आणि कर भरणे टाळण्यासाठी एकाधिक पॅन कार्डांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना शोधणे. तुमचे आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी आयकर खात्याच्या वेबसाईटच्या लिंकवर येथे क्लिक करा- https://www1.incometaxindiaefiling.gov.in/eFilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng
आपल्याला लेख कसा वाटला याबद्दल नक्की कळवा.पुन्हा भेटू नव्या विषयावर नवीन माहितीवर.
0 Comments