Top Updates

6/recent/ticker-posts

Aadhar

  

आधार कार्ड अपडेट करताय;तर हे वाचा
               नवी दिल्लीभारतात आता सर्व कामासाठी मग ते सरकारी असो की खासगी आधार कार्ड हा पुरावा मानला जातो. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. आधार कार्ड असेल आणि त्यात काही बदल करायचा असेल तर आधार केंद्रावर जाऊन त्याच बदल करता येतो.

             आधार कार्डमधील काही बदल हे कोणत्याही कागदपत्राशिवाय देखील होऊ

 शकतात. उदा- मोबाईल नंबरआधार कार्डवरील फोटो यासाठी कोणत्याही कागदपत्राची

 गरज नाही. या शिवाय बायोमेट्रिक्सलिंग आणि इ-मेल आयडीसाठी कोणत्याही

 कागदपत्राची गरज नाही.

            आधार कार्डधारकवरील नावपत्तालिंगमोबाईलनंबरई-मेल आयडीजन्म

 तिथी आदी बायोमेट्रिक्स बदल आधार सेवा केंद्रावर जाऊन बदल करू शकतात.

             आधार कार्ड मधील बदल करण्यासाठी बँक,पोस्ट ऑफिस तसेच काही

 निवडक आपले सरकार सेवा केंद्र (csc) मध्ये हि सुविधा चालू आहे. आपले सरकार सेवा

 केंद्रात बायोमेट्रिक आणि नवीन आधार सोडून सर्व सुविधा उपलब्ध आहेत.आपल्याला

 जर आधार सेवा कोणत्या बँकेत सुरु आहे अगर आधार साठी online appointment

घ्यायची असल्यास तुम्हाला uidai.gov.in या साईट वर जाऊन नोंदणी करू शकता.

               जर आपले आधार कार्ड हरवले असेल किंवा आपल्याला PVC आधार कार्ड हवे असेल तर आपण आधारच्या https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint वर जाऊन आधार रिप्रिंट हा पर्याय वापरून ५० रुपयामध्ये आधार घरपोच मिळवू शकता.यासाठी मोबाईल आधारला लिंक असणे गरजेजे नाही.

 UIDAI च्या नवीन नियमानुसार आधार कार्डमधील बायोमेट्रिक अपडेटसाठी १०० रुपये तर डेमोग्राफिक तपशील बदलण्यासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहेत.


Post a Comment

0 Comments