Top Updates

6/recent/ticker-posts

गुरुपौर्णिमा चे महत्व

 गुरुपौर्णिमा चे महत्व 

▪️उन्हाळा संपल्यानंतर येणाऱ्या आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला (जुलै-ऑगस्ट दरम्यान) गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते.

▪️ या पवित्र दिवशी शिव - आदियोगी म्हणजे पहिला योगी यांनी पहिल्यांदा सप्तर्षीं – सात जगप्रसिद्ध ऋषी – जे त्यांचे पहिले शिष्य होते, त्यांच्यामध्ये योग विज्ञान संक्रमित केले.

▪️ या दिवशी आदियोगी, आदि गुरु अर्थात प्रथम गुरु बनले. 
▪️सप्तर्षींनी या ज्ञानाचा जगभर प्रसार केला, आणि अगदी आजही, या पृथ्वीतलावरील प्रत्येक आध्यात्मिक प्रक्रियेमागे आदियोगींनी निर्माण केलेल्या अदभूत ज्ञानाची प्रेरणा आहे.

▪️गुरु हा शब्द संकृत भाषेत “अंधकार दूर करणारा” या अर्थाने वापरला जातो.

 ▪️गुरु साधकाचे अज्ञान दूर करतो, आणि त्याच्या आत असलेला निर्मितीचा स्त्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो.

▪️ गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारंपरिकरित्या साधक त्यांच्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात.

▪️ योग साधना आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो. 

▪️आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. 

▪️या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. 

▪️प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत.

▪️चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते.

▪️ व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. 
▪️त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. 

▪️म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.

▪️ जगात असे कोणतेही ज्ञान नाही जे महर्षी व्यासांनी सांगितले नाही म्हणून म्हणतात 'व्यासोच्छीष्टं जगत् सर्वं'


Post a Comment

0 Comments