पोटाचा घेर वाढतोय?
टेन्शन घेण्याऐवजी हे साधे-सोपे उपाय करा…

*१) पोटाचा वाढता घेर अनेकदा टिंगलटवाळीचा विषय असतो, परंतु जेव्हा हे प्रकरण स्वतःपर्यंत येऊन पोहोचतं तेव्हा तो एक चिंतेचा विषय झालेला असतो. अनेकजण वरवर कितीही म्हणत असले की, “वाढलेलं पोट हे सुखी माणसाचे लक्षण आहे”, तरी हे उसने अवसान फार दिवस टिकत नाही.मग चिंता आणि पोटाचा घेर वाढतच जातो. पर्यायाने आपल्या आरोग्याच्या समस्या वाढतच जातात. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ याकडे अधिक गंभीरतेने बघतात.आता पोटाचा घेर वाढला आहे म्हणजे नक्की काय? तर आपल्या कमरेभोवतीचे माप मोजून हा अंदाज लावता येतो. ओटीपोटाच्या ठिकाणी पुरुषांमध्ये ४० इंच आणि स्त्रियांमध्ये ३५ इंचापेक्षा जास्त लठ्ठपणा म्हणून ओळखतात.यावरून तुम्हाला लक्षात येईल की, तुमच्या पोटाचा घेर वाढला आहे का? जर तो वाढला असेल तर टेन्शन येणं स्वाभाविक आहे, पण यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला अनेक उपाय करता येऊ शकतात. *पुढे दिलेले काही उपाय तुमच्या पोटाचा घेर कमी करतीलच शिवाय एका टेन्शनपासून तुमची सुटका होईल….
* उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाता तेव्हा काही पथ्य आपल्याला पाळायची आहेत हे नेहमी लक्षात ठेवा.
*२) कॅलरीचा हिशोब*
तुम्ही काय खात आहात ते महत्त्वाचं आहेच, मात्र यातून आपल्याला किती कॅलरीज मिळतील याची माहिती नक्की ठेवा. सुरुवातीला त्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागेल.वेगवेगळे अॅप असतात त्यात कॅलरीचा हिशोब ठेवावा लागेल. आपल्याला आपण नक्की किती आणि काय खातो याचा अंदाज आला की हा हिशोब ठेवणं सोपं होतं.हा झाला एक भाग, दुसऱ्या बाजूला तुम्हाला जितक्या कॅलरीज मिळतात त्यापेक्षा अधिक कॅलरीज बर्न कराव्या लागतील. थोडक्यात तुम्हाला व्यायाम करावा लागेल.
*३) आहारात तंतुमय पदार्थांचा वापर*
आपल्या आहारात तंतुमय पदार्थ असतील तर ते वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत विषेशतः पोटाचा घेर कमी करण्यासाठी जास्त उपयोगी असतात. फायबर्स जे की आपल्याला तंतुमय पदार्थामधून मिळतात हे पचन क्रिया मंद करतात. याचा फायदा की, शरीरात पोषण तत्व कमी शोषली जातात आणि भूकेची तीव्रता कमी होते. हे फायबर्स कशातून मिळतात? पालेभाज्या आणि फळ हे पर्याय त्यासाठी आहेत.
*४) आहारात प्रथिनांचा समावेश*
पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात प्रथिनांचा समावेश करण्यास तज्ज्ञ नेहमीच सांगतात. त्याचा फायदा दीर्घकालीन असतो.एका अभ्यासात तर असंही दिसून आलं आहे की, ज्यांच्या आहारात प्रथिनं अधिक असतात त्यांना पोटाच्या वाढत्या घेराचा त्रास कमी असतो.
*५) आहारात कर्बोदके कमी*
आहारात काय असावं याबरोबर काय नसावं याकडेही लक्ष ठेवा. आहारात कर्बोदके कमी केल्याने वजन कमी होण्यास मदत होते, परंतु किती कमी करावे यासाठी तज्ज्ञ व्यक्तीकडून नक्की सल्ला घ्या.
*६) साखर नकोच*
साखर आणि साखरेचे पदार्थ तसेच साखर घातलेली पेयं तुमच्या पोटावरील चरबी वाढवण्यास मदतच करत असतात. शीतपेयं तर नक्कीच टाळायला हवीत.
*७) दररोज 35 मिनिट व्यायाम*
अनेकांना नियमित व्यायामाची सवय नसते. तेव्हा चालण्यापासून सुरुवात करता येईल. चालण्याचा व्यायाम कसा करायचा? सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमित करायचा.
*८) व्यायामाला पर्याय नाही*
चालण्याने सुरुवात करता येईल पण तो काही व्यायामाला पर्याय नाही. त्याचे अनेक फायदे आहेत. केवळ वजन कमी करायचं आहे म्हणूनच नाही तर दीर्घायुषी होण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि आजार टाळायचा असेल तर व्यायाम हा केलाच पाहिजे. व्यायामप्रकारांनी जास्तीच्या चरबीचे रूपांतरण मजबूत स्नायूत होते.
0 Comments