वर्षा ऋतु
बस्ती -आयुर्वेद हे शास्त्र शरीराचं स्वास्थ्य टिकविणं व काही आजार झाल्यास ते बरे करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ▪️साधारणत: पाच हजार वर्षापासून आयुर्वेद हे शास्त्र जगामध्ये वापरलं जात आहे. ▪️विशेषत: आपल्या भारत देशासाठी असणा-या हवामानासाठी बस्ती अतिशय उपयोगी आहे. म्हणूनच त्याला देशी चिकित्सा असं म्हणतात.▪️ आयुर्वेदामध्ये शरीर आजारी न पडता स्वास्थ्य टिकवण्यासाठी दररोज आवश्यक असणारा आहार, व्यायाम, योग याचं संबंधित व्यक्तीनुरूप म्हणजेच प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं प्रमाण सांगितलेलं आहे. ▪️एकमेव असं हे शास्त्र आहे जे प्रत्येक व्यक्तीसाठी असलेल्या गरजेनुसार स्वास्थ्य टिकवण्यासंबंधित चिकित्सा करते.▪️ शरीरातील रोज होणारी झीज भरून काढण्यासाठी आपल्याला आहाराची आवश्यकता असते.▪️ त्यासाठी आपण दररोज परिपूर्ण आहार घेत असतो, तरीही वातावरणातील बदलामुळे (ऋतुमानानुसार) काही आजार उद्भवू शकतात. ▪️त्या आजारामध्ये सर्दी, खोकला, अतिसार, ताप, आम्लपित्त इ. विकारांचा समावेश होतो.▪️यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्म – पाच चिकित्सांचा समूह, जसं की वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण अशा उपचार पद्धतींचा वापर केला जातो. ▪️पंचकर्म ही क्रमवार पद्धतीनं करण्याची चिकित्सा आहे. यामध्ये दोन पद्धतीनं चिकित्सा करतात.▪️पहिली चिकित्सा सर्वसामान्यांसाठी पंचकर्म किंवा ऋ तुपरत्वे सर्वासाठी केलं जाणारं पंचकर्म.१) पावसाळा – स्नेहन, बस्ती (वात)२)उन्हाळा – विरेचन (पित्त), रक्तमोक्षण३) हिवाळा – वमन, नस्य
0 Comments