Top Updates

6/recent/ticker-posts

ऍसिडिटी वर उपचार

 ऍसिडिटी वर उपचार

             ऍसिडिटी अथवा आम्लपित्त ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. बऱ्याच माणसांना कधी ना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना ऍसिडिटीचा नेहमी त्रास होतो. आम्लपित्त अथवा ऍसिडिटी म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. हे आम्ल अन्न पचनासाठी अत्यंत आवश्‍यक असते. परंतु, त्याच्या अति जास्त प्रमाणामुळे आम्लपित्त अथवा ऍसिडिटीचा त्रास सुरू होऊ शकतो. 
         सतत जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाणे. तेलकट पदार्थ खाणे. अनियमित जेवणाच्या सवयी, जेवण्याच्या अनियमित वेळा, जागरण, मानसिक ताण -तणाव, सततची काळजी व चिंता, सततची घाई, गडबड या कारणांमुळे ऍसिडिटी होऊ शकते. तसेच धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन यामुळेसुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. काही औषधांमुळेसुद्धा ऍसिडिटी वाढू शकते, उदा. अन्टिबायोटीक, एस्पिरीन, सांधेदुखीची औषधे, वेदनाशामक (पेन किलर) औषधे. सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये आपले जीवनमान खूप बदललेले आहे. नवनवीन शोधांमुळे कामाचे, खाण्याच्या आवडींचे, पेय पदार्थ या सर्वांमध्ये फार बदल झाला आहे. तसेच व्यवसाय, धंदा, नोकरी यामुळे कामाच्या स्वरूपातही बदल झाला आहे. आपल्या पोटात औषधी, खाद्य पदार्थांमधली भेसळ, प्रदूषण यामुळे शरीरात अपायकारक अशी अनेक कृत्रिम रसायने जातात. निसर्ग नियमाप्रमाणे झोपणे व उठणे यातही बदल झाला आहे. या सर्व बाबींचा शरीरावर कमी-अधिक परिणाम होऊन आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो.


ऍसिडिटीची प्रामुख्याने पुढील लक्षणे दिसून येतात.

         छातीत जळजळ होणे, पोटात तसेच घशात जळजळ होणे, अंग जड पडणे, वारंवार आंबट कडू पाणी तोंडात येणे, नेहमी नेहमी तोंड येणे, मळमळणे, डोके दुखणे, आणि आंबट, पिवळसर, उलटी झाल्यानंतर डोकेदुखी कमी होणे. अस्वस्थ वाटणे, करपट ढेकर येणे. हातापायाच्या तळव्यांची आग होणे, डोळे लाल होणे, जळजळ होणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे, अंगावर तांबूस रंगाचे फोड किंवा गांध्या येणे, अंगाला खाज सुटणे. ऍसिडिटीवर वेळीच उपचार झाले नाहीत, तर पुढे त्याचे दुष्परिणाम गंभीर होऊ शकतात. उदा. पोटात अल्सर होणे, पित्ताशयात खडे होणे, यकृताशी संबंधित काही गंभीर आजार होऊ शकतात.


उपचार

      प्रतिबंधात्मक उपायांमध्ये आपण आपली दिनचर्या नियमित ठेवली, तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
    आपला स्वभाव रागीट अथवा खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे. व्यसनांपासून सदैव दूर राहावे. तसेच फास्ट फूड, कोल्डड्रिंक याचे सेवन टाळावे.


Post a Comment

0 Comments