Top Updates

6/recent/ticker-posts

देवशयनी एकादशी

 ☀️ *देवशयनी एकादशी* ☀️

▪️ देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी.

▪️ एकादशी म्हणजे आपले एकादश इंद्रिये भगवंत चरणी समर्पित करणे.
पाच कर्मेंद्रिये,पाच ज्ञानेंद्रिये , व मन हे 11 गोष्टी भगवत कार्य मध्ये जोडणे म्हणजेच एकादशी.

▪️स्वाध्याय प्रणेते पांडुरंगशात्री आठवले यांनी एकादशी चा अर्थ सांगितला आहे.

▪️ते म्हणतात एकादशी म्हणजे फक्त खाण्यात बदल नाही तर चालण्यात,वृत्तीत बदल झाला पाहिजे.

▪️एकादशी दिवशी व्यक्तींनी भगवंताचे विचार लोकांना सांगण्यासाठी  निरपेक्ष भावाने बाहेर पडले पाहिजे.

▪️14 दिवस मी माझ्यासाठी जगेन आणि 1 दिवस भगवंता साठी म्हणून 15 दिवसांनी एकादशी येते.

▪️ एकादशी दिवशी फलाहार सांगितला आहे फराळ नव्हे,याचे कारण माझा भगवंताचा  दिवस जेवण बनवण्यात जावू नये .

▪️ वारीला जाणे म्हणजे भगवंताचे विचार, प्रेम रस्त्यांनी लोकांना देत त्यांच्याकडून काहीही न घेता  त्याचा रिपोर्ट भगवंताला देण्यासाठी जाणे.

▪️ भगवंताला तुमचे विशुद्ध मन हवे आहे,तुमचा पैसा नको तो तर स्वतः लक्ष्मी पती आहे.

▪️एकादशी म्हणजे 14 दिवस भगवंत आपली सेवा करत असतो एक दिवस आपणही त्याच्या प्रमाणे त्याला आवडेल अशी सेवा करण्याचा दिवस.


Post a Comment

0 Comments