Top Updates

6/recent/ticker-posts

पावसाळ्यातील होणारी पोटदुखी

पावसाळ्यातील होणारी पोटदुखी आणि इतर आजार

        पावसाळ्यात विविध आजारांविषयी आपल्याला माहिती असते. मात्र, पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा, याची पुरेशी माहिती घेतली जात नाही. चुकीच्या आहाराच्या पद्धतीमुळे पोटदुखी, गॅस, अपचनासोबत पोटाच्या तक्रारी त्रास देण्याची शक्यता असते.

        पावसाळ्यात जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे खूप खावेसे वाटले तरी अन्नाचे पचन मात्र चांगले होत नाही. या ऋतूत पचनास अतिशय हलका असलेला आहार घ्यायला हवा. काहीवेळा खूप खाल्ल्याने पोटाच्या व्याधी निर्माण होतात.

का होते पोटदुखी?

हवा दमट आणि उष्ण हवेत वाढलेली विषाणूंची संख्या.

पाणी दूषित पाण्यावाटे शरीरात प्रवेश करणारे जिवाणू.

अन्न दमट हवेत पदार्थाना चटकन बुरशी येते. हे अन्न खाल्ल्यावर विषबाधा होते.

उपाय

पाणी गाळून, उकळलेले पाणी थंड झाल्यावर प्यावे. हे पाणी चार तासांपेक्षा अधिक काळ ठेवू नये.

पदार्थ उघडय़ावरचे, शिळे पदार्थ टाळावेत. पावसाळ्यात दमट हवेमुळे सर्वच सुक्ष्म जंतूचे प्रमाण वाढलेले

             असते. माश्यांवाटेही हे जंतू सर्वत्र पसरतात. पदार्थाना बुरशी येते.

सकस आहार पोळी, भाजी, भात, आमटी, कोिशबीर असा चौरस व सकस आहार घ्यावा. गरजेपेक्षा कमी        

                         किंवा अधिक खाऊ नये.

झोप सकस आहारासोबत पुरेशी विश्रांती, झोप घेतल्यास शरीराची प्रतिकारक्षमता वाढते. आजार होत

           नाहीत आणि संसर्ग झाल्यास लवकर बरे होता येते. 

             पाऊस सुरू असला की, वातावरणामध्ये बराच फरक पडत असतो. त्यावेळी दमट हवा असते. भिंती, घरे यांना ओल राहते, कपडे सुकत नाहीतढगाळ हवामान राहते. मग, अशावेळी दम्यासारखे व संधिवातासारखे भयंकर दमछाक करणारे आजार डोके वर काढतात. ओल्या कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शन होते. स्कीनच्या तक्रारी चालू होतात. पाण्यात ज्यांना काम करावे लागते त्यांना चिखल्यासारखे आजार उत्पन्‍न होतात. शिवाय, दूषित पाण्यामुळे डिसेंट्री, कॉलरा, गॅस्ट्रो (उलटी-जुलाब) यासारख्या पोटांच्या तक्रारी जास्त प्रमाणात दिसून येतात. शिवाय, कावीळ, डेंग्यू, चिकुनगुण्या, टॉयफॉईड, मलेरियासारखे आजारही या दिवसांतील डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे वाढलेले असते. हे वरील सर्व आजार टाळायचे असतील तर आधी शरीर तंदुरुस्त करायला हवे व आपली प्रतिकारशक्‍ती वाढवावी लागेल. 
             
जे लोक फार सेन्सीटीव्ह असतात त्यांची ही प्रकृती वातावरण बदलतानाची सेन्सीटीव्हीटी Controlमध्ये आणता येते. त्यामुळे पावसाळा असो, उन्हाळा असो वा हिवाळा असो, त्या व्यक्‍तींना सहजच त्या वातावरणात मिळते-जुळते होण्यासाठी शरीराची तयारी होते.   त्या त्या व्यक्‍तीची शारीरिकता, मानसिकता, खाण्या-पिण्याच्या आवडी निवडी, अनुवंशिकता, प्रकृती थंड-उष्ण या गोष्टींचा बारकाईने सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो.

Post a Comment

0 Comments