विरुद्ध आहार म्हणजे काय?
विरुद्ध आहार म्हणजे काय?
सध्याच्या काळात बऱ्याचदा आपल्या आहारात आढळणाऱ्या विरुद्धाहाराची यादी आपल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून शेयर करतोय.
- दूध + फळ/मीठ/मांस/मासे/आंबट असे एकत्र वा लगेच मागेपुढे खाणे.
- वरण भात + दूध
- दूध घातलेला चहा + चपाती/भाकरी/बिस्कीट
- चहासोबतच नाश्ता करणे
-मिल्कशेक वा केळ्याची दुधातील शिक्रण
-दही तसेच मध गरम करणे वा गरम पदार्थांवर घेणे
-तूप + मध हे मिश्रण समप्रमाणात घेणे
-विशेषतः पंजाबी भाज्या वगैरे तयार करताना त्यांत दूध/क्रीम इ. घालणे
-भाज्यांचे ब्लांचिंग करणे
-तूप वा तळलेले पदार्थ खाल्ल्यावर थंड पाणी पिणे
-शिळे पदार्थ खाणे
-फ्रीजचा अवाजवी वापर (विशेषतः मळलेली कणिक वा शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवून वापरण्याची फॅड्स)
-जेवताना दूध घातलेले खिरीसारखे गोड पदार्थदेखील शक्यतो टाळणे इष्ट.
0 Comments