Top Updates

6/recent/ticker-posts

Everything about PF / PPF

पीएफ (PF) / पीपीएफ (PPF) बद्दल सर्वकाही

    


      पीएफ (PF)/पीपीएफ (PPF)  बद्दल  बहुतेक लोकांना माहित नसते. त्यामुळे आपण एखाद्या एजन्ट किंवा टॅक्स कंसल्टंट/CA कडे जाऊन त्यांचा सल्ला घेतोत्याप्रमाणे ते त्यांचे कमिशन पण घेतात. पण PF / PPF हि  अगदी सरळ आणि सोपी पध्दत आहे.तुम्ही स्वतः घरबसल्या मोबईल अथवा लॅपटॉप च्या साहाय्याने तूमच्या PF बद्दल माहिती घेऊ शकता. याबद्दलच आपण पुढील दोन भागात माहिती घेणार आहोत.

                कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)

            कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) ही १९५२ मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. ‘भविष्य निर्वाह निधी’ अर्थात ‘पीएफ’ (PF) हा निवृत्तीनंतर सर्वात सुरक्षित आणि महत्त्वाचा आधार असतो. खाजगी तसेच शासकीय अथवा निम-शासकीय कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीसाठी वेगवेगळे नियम असतात.नोकरी करणाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक फायदा व्हावा म्हणून ही योजना आहे.
           कुठल्याही कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचा पगार अनेक भागात असतो. बेसिक सॅलरीट्रॅव्हल अलाऊन्सेसस्पेशल अलाऊन्सेस हेही असतात.प्रत्येक महिन्याला कंपनी कर्मचारीतील पगारातले 12 टक्के कापून PF खात्यात टाकते.त्याबरोबर कंपनी कर्मचारीसाठी त्यांच्या कडून 12 टक्के पैसे PF खात्यात टाकते.त्यावर व्याजही चांगले मिळते यांचा व्याज दर सरकार ठरवतं.सध्याचा PF चा व्याज दर 8.5 टक्के आहे.   

         या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ देण्याबरोबरच दोन अतिरिक्त लाभही आहेत. कर्मचारी निवृत्तिवेतन योजना  (Employees Pension Scheme) कर्मचारी ठेवीशी निगडित विमा योजना  (Employees Deposit Linked Insurance Scheme) कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या खातेदारांना कर्मचारी पेन्शन स्कीम शिवाय जीवन विम्याचा फायदाही मिळतो. Employees Deposit Linked Insurance Scheme योजनेअंतर्गत अतिरिक्त जीवन विमा संरक्षण मिळते. यासाठी खातेदारांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. 

       या स्कीम अंतर्गत वारसदार खातेदाराचे आजारपण अपघात किंवा आकस्मित मृत्यू नंतर विमा रकमेसाठी क्लेम करू शकतो. यामध्ये एकरकमी पैसे मिळतात. विमा संरक्षण रक्कम ही  खातेदाराचा मृत्यू झाल्यास मागील 12 महिन्याच्या सरासरी पगाराच्या 20 पट व सोबत 20 टक्के बोनस अशी ठरवली जाते. जर पीएफ खातेदाराचा अचानक मृत्यू झाला तर त्याचा कायदेशीर वारसदार इन्शुरन्स संरक्षणासाठी क्लेम करू शकतो यासाठी इन्शुरन्स कंपनीला डेथ सर्टीफिकीटसक्सेशन सर्टीफिकीट आणि बँक डिटेल्स द्यावे लागतात या विम्यासाठी क्लेम तेव्हाच करता येतो जेव्हा खातेदाराचा मृत्यू निवृत्ती च्या अगोदर होतो म्हणजेच निवृत्ती नंतर  हा विमा लागू होत नाही.

 पीएफ आणि पीपीएफ यामधील फरक (PF & PPF)

    PF आणि PPF यामधील फरक अनेकांना माहीत नसतो. नोकरदारांच्या पगारातील कापली जाणारी रक्कम म्हणजे पीएफ असते. तरपीपीएफ म्हणजेच केंद्र सरकार चालवत असलेली पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना. यासाठी तुम्हाला कुठल्या कंपनीचे कर्मचारी असणं गरजेचं नाही. पीपीएफमध्ये तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे पैसे गुंतवू शकता. किती पैसे गुंतवणूक करायचे हे ऐच्छिक आहे. कुठल्याही राष्ट्रीय बँकेतपोस्टात किंव्हा जवळच्या CSC केंद्रात खाते काढून याची रक्कम जमा करता येऊ शकते.
    यामध्ये स्वेच्छेने दर आर्थिक वर्षात कमीत कमी 500 व जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये भरता येऊ शकतात. खातेदार एक रकमी अथवा संपूर्ण वर्षात जास्तीत जास्त बारा हप्त्यात भरणा करू शकतो. हे खाते सुरु करण्यास लिंगउत्पन्न व शिक्षण याबाबतीत कोणतीच अट नाही. कोणत्याही एका व्यक्तीला एकच खाते सुरु करता येते. PPF चा व्याज दर प्रत्येक तीन महिन्यांनी नक्की होतो. सध्याच्या व्याज दर 7.1%.आहे.
पुढील लेखात आपण UAN नंबर कसा मिळवावा? UAN कार्ड कसे मिळवावे?  


KYC  
अपडेटेड कसे करायचे?

जमा रक्कम कशी पहावी?

पासबुक कसे डाऊनलोड करावे

ऑनलाईन PF कसा काढावा

Post a Comment

0 Comments