Top Updates

6/recent/ticker-posts

Everything about PF / PPF

 कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)

       PF काढण्याची प्रोसेस अगदी सरळ आणि सोपी आहे.तुम्ही स्वतः घरबसल्या मोबईल अथवा लॅपटॉप च्या साहाय्याने ऑनलाईन अर्ज करू शकता. तर जाणून घेऊया

UAN नंबर कसा मिळवावा

UAN कार्ड कसे मिळवावे?

 KYC अपडेटेड कसे करायचे

ऑनलाईन PF कसा काढावाजमा रक्कम कशी पहावी?

        पीएफ खातेधारक खात्यामधून केव्हाही पैसे काढू शकतात. हे पैसे काढणेही अगदी सुलभ आहे. खात्यातील ९० टक्के पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेचजुन्या नोकरीतील पीएफ नव्या नोकरीतही ट्रान्सफर करता येऊ शकतो. त्यातूनच पेन्शनचाही फायदा मिळतो. कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)  सदस्यांना काही प्रमाणात निधी काढण्याची मुभा आहे. 

       गृहखरेदीसाठी ईपीएफ’ खात्यातून ९० टक्के रक्कम काढता येते. घराचे नूतनीकरण किंवा दुरुस्तीसाठीदेखील ९० टक्के रक्कम काढता येते. घर खरेदीसाठी यापूर्वी गृहकर्ज काढले असेल तरीही गृहकर्जाच्या परतफेडीसाठी ९० टक्के रक्कम काढता येते. वैद्यकीय गरजअपत्यांचा विवाहनोकरी गेल्यास ७५ टक्के निधी काढता येतो. मुलांच्या लग्नासाठी ५० टक्के रक्कम काढण्यास परवानगी आहे. मात्रत्यासाठी ईपीएफ’ खाते किमान ७ वर्षे जुने असले पाहिजे. 

       ऑनलाईन प्रोसेस : UAN लॉगीन यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर(UAN)ची आवश्यकता असते. हा नंबर कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) यांच्याकडून प्रत्येक नोकरदारास देण्यात येतो. जर तुम्हाला तुमचा UAN नंबर माहिती नसेल तर खाली दिलेल्या माहिती प्रमाणे आपण आपला यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN)नंबर मिळवू शकता. 

यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) कसा मिळवावा?

        यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) तुमच्या सॅलरी स्लिपवर लिहीलेला असतो. पण तो सॅलरी स्लिपवर तुम्हाला मिळत नसेल किंवा सॅलरी स्लिपच नसेलतर  पुढील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा यूनिव्हर्सल (UAN) नंबर काय आहे? ते अगदी सहज जाणून घेऊ शकता.

१. सर्वात आधी या लिंक वरती क्लिक करून UAN लॉगीन करा 

https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/

२. पहिल्याच वेबपेजवर डावीकडे खालच्या बाजूला  'Know Your UAN Status' हा ऑप्शन दिसेल.  त्या ऑप्शनवर क्लिक करा.

३. आता तुमच्या समोर तीन वेगवेगळे पर्याय दिसतील - जसे  की,  मेंबर आयडीआधार कार्ड आणि पॅन. या तीन पैकी कोणताही एक पर्याय निवडा.

४. पुढे तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती - नावजन्मतारीखरजिस्टर मोबाईल नंबररजिस्टर ईमेल एड्रेस इत्यादी.

५. ही माहिती व्यवस्थित भरल्यानंतर 'Get Athourization Pin' या पर्यायांवर क्लिक करा.

६. त्यानंतर ओपन झालेल्या  पुढच्या पेजवर I Agree या पर्यायापुढे क्लिक करा.

७. कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)  कडून तुमच्या मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे ओटीपी(OTP) पाठवला जाईल. ८. हा मिळालेला ओटीपी कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)  वेबसाईटवर टाका.

८. ओटीपी टाकल्यावर तुम्हाला व्हॅलिडेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला तुमचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) मिळेल.

९. ईपीएफओकडून तुम्हाला एक एसएमएस पाठवून देखील यूनिव्हर्सल अकाउंट नंबर यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) दिला जाईल.

१०. नंतर आपण लॉगीन करून आपले यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) कार्ड डाउनलोड करू घेऊ शकता. आता https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/  पुन्हा या लिंक वरती क्लिक करून UAN लॉगीन करा  आपल्याला  मिळवलेला यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) टाका.आता आपणाला आपला dashboard दिसेल.

KYC अपडेटेड कसे करायचे?

          
     सर्वात आधी आपली माहिती अपडेट असणे गरजेचे आहे त्यासाठी पुढील महितीच्या आधारे आपली KYC अपडेटेड करून घ्या. KYC अपडेटेड KYC अपडेटेड असणे म्हणजे या मध्ये आपले आधारपॅनबँक खाते हे सर्व ग्राह्य असले पाहिजे. नसेल तर आपण “Manage” या पर्याय मध्ये जाऊन KYC मध्ये सर्व माहित भरून अर्ज करू शकता. 
         
    अर्जानंतर ते मंजूर झाले अथवा नाही हे त्याच page वरती पाहता येईल. तुम्ही काम करत असलेली संस्था आणि PF कार्यालय यांच्या कडून हे मंजूर/ना मंजूर केले जाते.

 ऑनलाईन PF कसा काढावा? 

                    PF साठी अर्ज लिहण्याची तो ऑफिस मध्ये देण्याची  गरज नाही. कारण आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. KYC मधील माहितीची पूर्तता केल्यानंतर तुम्ही थेट अर्ज करू शकता. सर्वात आधी या लिंक वरती क्लिक करून UAN लॉगीन करा.

https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/

        “Online Services” या पर्याय मध्ये Claim या वर क्लिक करा.

     त्यानंतर तुम्हाला आपले बँक खाते व्हेरिफाय करावे लागेल. बँक खाते क्रमांक जो आपण KYC मध्ये दिला आहे तो टाकून “verify” वर क्लिक करास्क्रीन वर आलेल्या yes हा पर्यायावर क्लिक करा. 

      
    आता आपल्याला “PF advance”  हा पर्याय निवडायचा आहे. येथे पीएफ काढण्याचे कारण निवडा.शक्यतो Covid-19 हे कारण सध्याच्या स्थितीमध्ये जास्त योग्य राहील. या नंतर जितकी रक्कम काढणार आहेत ती टाकावी.

       आपले पासबुक चे पहिले पानं अथवा एक चेक अपलोड करावे. आधार OTP वरती क्लिक करून आलेला OTP टाकून “Validate OTP and Submit claim form“वर क्लिक करा.

पीएफ कधी जमा होईल?

        जवळपास दोन ते तीन आठवड्यांमध्ये आपल्या बँक खात्यावर PF जमा झाल्याचा मेसेज येईल. तसेच पासबुक देखील अपडेट केले जाईल. पीएफ जमा होण्यास विलंब लागत असेल तर आपण कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)   च्या विभागीय कार्यालयात फोन करू शकता अथवा आपल्या एम्प्लॉयर कडे संपर्क करू शकता.

भविष्य निर्वाह निधीतील शिल्लक कशी तपासाल?

       भविष्य निर्वाह निधीतील शिल्लक रक्कम साधारणत: चार वेगवेगळ्या मार्गांनी चेक करता येते. UMANG App, Missed Call, SMS आणि ईपीएफओ द्वारे पाहणं सहज शक्य आहे.

१. EPFO च्या पोर्टलवरुन 'Our Services' टॅबवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला 'for employees' हा पर्याय दिसेल. यामध्ये सर्विस सेक्शनमध्ये मेंबर पासबूक या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर एक लॉगिन पेज ओपन होईल. यामध्ये तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाका. लॉगिन केल्यावर तुम्हाला EPF अकाऊंटची सर्व माहिती तुम्ही पाहू शकता.

२. तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 011-22901406 या क्रमांकावर कॉल केल्यास दोन रिंग झाल्यावर तुमचा फोन आपोआप कट होईल.

३. ईपीएफची माहिती तुम्हाला SMS च्या माध्यमातून मिळेल. यासाठी तुम्हाला इंग्रजीत EPFOHO UAN MMAR टाईप करुन 7738299899 या क्रमांकावर सेंड करावं लागेल. म्हणजेच सुरूवातीला EPFOHO टाईप करा त्यानंतर स्पेस द्या मग तुमचा UAN नंबर लिहा. यानंतर पुन्हा एक स्पेस द्या आणि ज्या भाषेत तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची माहिती हवी आहे ती भाषा लिहा. म्हणजेच जर तुम्हाला इंग्रजीत माहिती हवी आहे तर यूएएन नंबर टाईप केल्यावर स्पेस द्या आणि नंतर MAR टाईप करा. इंग्लिशमध्ये माहिती मिळवण्यासाठी ENG टाईप करा.

४. पीएफची माहिती तुम्ही मोबाइल app च्या माध्यमातूनही मिळवू शकता. भारत सरकारचं UMANG app डाऊनलोड करा आणि तेथे EPFO सेक्शनमध्ये आवश्यक माहिती भरून  तुम्ही तुमचा PF Balance चेक करु शकता.


Post a Comment

0 Comments