Top Updates

6/recent/ticker-posts

Passport

                                              पासपोर्ट



            पासपोर्ट हे सरकारी दस्तावेज आहे. पासपोर्ट अर्थात पारपत्र म्हणजे आपल्या देशातून बाहेर (अन्य कुठल्याही देशात) जाण्यासाठी सरकारकडून मिळालेली रितसर परवानगी. ही परवानगी काही अटींवर मिळते. पासपोर्टमध्ये संबधित व्यक्तीचे नाव, फोटो, नागरिकत्व, पत्ता, पालकांचे नाव, लिंग, व्यवसाय आणि इतर माहिती दिली जाते. 

पासपोर्टचे प्रकार

१  १. पर्सनल पासपोर्ट :- 

                यालाच Ordinary Passport असे देखील म्हणतात. दाट निळ्या रंगाचा असतो. यात ३० ते ६० पानं असतात. तसेच याला पी-प्रकार पासपोर्ट म्हणतात. सामान्य नागरिकाला सामान्य प्रवास करण्यासाठी म्हणून दिले जाते, जसे की सुट्टीतील, अभ्यास आणि व्यवसाय ट्रिप.    

२  २.ऑफिशियल पासपोर्ट :-

                  हा पासपोर्ट केवळ त्या सरकारी अधिकाऱ्याला दिला जातो. जे देशाच्या बाहेर जावून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. हा सफेद रंगाचा असतो. याला एस-प्रकार पासपोर्ट म्हणतात.    

३  ३.  डिप्लोमॅटिक पासपोर्ट :- 

                 हा पासपोर्ट भारतीय डिप्लोमॅटिक आणि उच्च दर्जाचे अधिकारी यांना दिला जातो. भारतीय राजनैतिक, केंद्रीय कौन्सिल ऑफ मंत्री, काही उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी यांना हे पासपोर्ट देण्यात येते. तसेच विनंती केल्यावर अधिकृत व्यवसायावर प्रवास करणार्याला, उच्च-रँकिंग स्टेट-लेव्हल अधिकार्यांनाही हे दिले जाऊ शकते.  तो हिरव्या रंगाचा असतो. याला डी-प्रकार पासपोर्ट असे म्हणतात. 

लोकांना पासपोर्ट आणि व्हिसा यातील फरक माहिती नसल्यामुळे ते गोंधळून जातात. पासपोर्ट आणि व्हिसामध्ये नेमका काय फरक असतो ते पाहूया.

व्हिसा म्हणजे एखाद्या व्यक्तीस बाहेरच्या देशात राहण्यासाठी दिलेली परवानगी असते. जर तुम्हाला जपानला  जायचे असेल तर जपानचा व्हिसा घेऊनच आपण त्या देशात जाऊ शकतो. 



व्हिसाचे प्रकार

१)      टूरिस्ट व्हिसा – 

            इतर देशामध्ये प्रवासासाठी जायचे असल्यास टूरिस्ट व्हिसा जारी केला जातो. पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रवासी व्हिसा देणारे अनेक देश आहेत.  

२)      ट्रान्झिट व्हिसा –

              हा एक अल्पकालीन व्हिसा आहे.

३)      बिझनेस व्हिसा  

             हा व्हिसा व्यावसायिक हेतूंसाठी जारी केला जातो.

४)      वर्कर व्हिसा  

             हा व्हिसा कायम कामगारांना देण्यात येतो. जेणेकरुन ते कायदेशीररित्या कार्य करू शकतील.

५)      फियांसी व्हिसा -  

             हा व्हिसा त्याला देण्यात येतोज्याचा विवाह दुसऱ्या देशातील व्यक्तीशी ठरला आहे आणि त्याला या देशात जायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला भारतातील महिलेशी विवाह करायचा असेल तर त्याला हा व्हिसा देण्यात येतो.

पासपोर्ट मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१. दहावी मार्कशीटआधार कार्डपॅनकार्डमतदार ओळखपत्र किंवा जन्मतारखेचा ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी एक दस्तऐवज).

२. वीज वितरण किंवा पाण्याचे बिलरेशनकार्डआयकर विभागाचे मूल्यांकन आदेशमतदार ओळखपत्रआधार कार्डपत्त्याच्या वितरणासाठी बँक पासबुक.

 

Post a Comment

0 Comments