Top Updates

6/recent/ticker-posts

e-EPIC मतदान कार्ड Voter Card Download

  मतदान कार्ड

 (Voter Card Download)

         






      

        सराकारी कामं पूर्ण करण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. मग ते मतदान कार्ड (VOTER CARD) e-EPIC काढायचं असलं तरी पण आता तुमची या फेऱ्यामधून सुटका होणार आहे. तुमच्या हातातील स्मार्टफोनवरही तुम्ही मतदान ओळखपत्र (VOTER CARD) e-EPIC मिळवू शकणार आहात. आधार कार्ड e-EPIC (AADHAR CARD), पॅन कार्ड (PAN CARD) आणि ड्रायव्हिंग लायसन्स (DRIVING LICENCE) यांच्यानंतर आता मतदान ओळखपत्रही (VOTER CARD) e-EPIC डिजीटल स्वरुपात उपलब्ध झाले आहे. ज्या मतदारांचा (VOTER) e-EPIC मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला आहे व २०२१ दरम्यान नोव्हेंबर २०२० नंतर नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांसाठी (VOTER) e-EPIC डाउनलोड सुविधा उपलब्ध आहे. इतरांसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध होईल.

ई-मतदार (e-EPIC) ओळखपत्र असे करता येणार
सर्व प्रथम 
https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/account/login या संकेतस्थळाला भेट द्या. यानंतर तुम्हाला लॉग-इन करावे लागेल. जर तुमचे अकाऊंट नसेल तर मोबाइल नंबरच्या मदतीने तुम्ही अकाऊंट सुरू करु शकता. वेबसाईटवर लॉग-इन केल्यावर Download e-EPIC या टॅबवर क्लिक करा.व आपली माहिती भरून आपले e-EPIC डाउनलोड करा. 
     आपले नाव मतदार यादीत (VOTER LIST ) पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाईटवर आपण आपले नावमतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो. ते कसं याबाबत जाणून घेऊयात...
▪ आपले नाव पाहण्यासाठी   http://103.23.150.139/marathi/ या लिंकवर क्लिक करा
▪ यानंतर आपल्यासमोर Name Wise आणि ID Card Wise हे दोन पर्याय दिसतील
▪ यातील Name Wise पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे District आणि Assembly असे दोन पर्याय समोर येतील
▪ त्यापैकी Assembly हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील.
▪ त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो Select District. यात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
▪ त्या पुढचा पर्याय Select Assembly. यात तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा.
▪ त्यानंतर तुमचे नावआडनावतुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका.
▪ हे सर्व रकाने भरल्यानंतर Search या पर्यायवर क्लिक करा.
▪ ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नावतुमचा मतदार क्रमांक
वय याबाबतची माहिती समोर येईल.
              जर तुम्हाला तुमचे मतदान केंद्र पाहायचे असल्यास त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. तसेच तुम्ही कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहू शकता.

Post a Comment

0 Comments