
झिरो बॅलेन्स सेव्हिंग अकाऊंट
(Zero Balance Savings Accounts)
तुमचं बँकेत अकाऊंट आहे आणि अकाऊंटमध्ये शिल्लक रक्कम कमी झाल्याने पेनल्टी भरावी लागत आहे ? बँकांमध्ये असणारी कमीतकमी शिल्लक रु. १००० ते रु. १०००० पर्यंत ठेवणे आवश्यक आहे. हि शिल्लक ठेवणे अनेकांना शक्य होत नाही.
अशा लोकांसाठी देशातील काही बँका झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाऊंट (Zero Balance Savings Accounts) ऑफर करत आहेत. यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसते. जर तुम्हालाही झिरो बॅलन्स अकाऊंट (Zero Balance Savings Accounts) सुरु करायचं आहे तर हा ब्लॉग तुमच्यासाठी महत्वाचा आहे.
बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) हे झिरो बॅलन्समध्ये (Zero Balance Savings Accounts) उघडता येते. इतकेच नव्हे तर या खात्यामध्ये ठरावीक अशी रक्कम भरावी अशी कोणतीही अट किंवा बंधन नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI )

बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट हे खाते YYono App च्या सहाय्याने उघडू शकता. बँक तुम्हाला Rupay कम डेबिट कार्ड देईल. यामध्ये तुम्हाला एसबीआय एटीएम आणि अन्य बँकांच्या एटीएममधून 4 कॅश विड्रॉल मोफत मिळेल.
https://www.sbiyono.sbi/wps/portal/accountopening/digital-account#!/aoCustomerOpenOVD
कोटक महिंद्रा बँक - ८११
(Kotak Mahindra Bank) – 811

डिजिटल बँक अकाऊंट-या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. डिजिटल बँकिंगचा वापर करून हे खाते उघडता येईल. यामध्ये तुम्हाला 811 व्हर्च्यूअल डेबिट कार्ड मिळेल. याचा वापर करून तुम्ही ऑनलाइन शॉपिंग, बिल पेमेंट आणि DTH रिचार्ज करू शकता.
https://www.kotak.com/811-savingsaccount-ZeroBalanceAccount/811/ahome2.action
इंडसइंड बँक (IndusInd Bank)

इंडसइंड ऑनलाइन सेव्हिंग अकाऊंट या खात्यामध्ये अनलिमिटेड एटीएम ट्रान्झॅक्शनचा फायदा मिळतो. तसंच मोबाइल बँकिंग आणि नेटबँकिंगच्या सेवा मोफत मिळतात. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आधार आणि पॅन देऊन झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडू शकता.
रत्नाकर बँक

तसेच बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा इत्यादी बँकेमध्ये जर आपल्याला झेरो बॅलेन्स अकाऊंट (Zero Balance Savings Accounts) काढायचे असेल तर आपल्याला या बँकांच्या ग्राहक सेवा केंद्रा मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड व एक फोटो घेऊन जावे लागेल.

0 Comments