HSC Result 2021
बारावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालाची (HSC Result 2021) वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला बारावीच्या निकालाची (HSC Result 2021) घोषणा ऑनलाइन दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
असा असेल बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला
शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एचएससी 2021 चा निकाल अधिकृत वेबसाइटवर कसा पहायचा

बारावीचा बैठक क्रमांक पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
स्टेप 1: mahresult.nic.in व mahresult.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, ‘एचएससी परीक्षा निकाल 2021’
(HSC Result 2021) वर क्लिक करा.
स्टेप 3: आपली माहिती भरून लॉगिन करा.
स्टेप 4: परिणाम प्रदर्शन स्क्रीनवर दिसून येईल.
स्टेप 5: आपला निकाल डाउनलोड करा आणि आवश्यक असल्यास प्रिंट आउट घ्या.
0 Comments