
21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान घेण्यात आलेल्या महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ HSC परीक्षांचा निकाल उद्या दिनांक २१ मे २०२४ रोजी दुपारी ठीक १वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

HSC परीक्षा दिलेले लाखो
विद्यार्थी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती तो क्षण उद्या येणार आहे.मागच्या वर्षी बारावीचा निकाल २५
मे २०२३ रोजी जाहीर झाला होता त्यामुळे विद्यार्थ्याना या आठवडयात निकाल लागेल असे वाटत होते.यावर्षी १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

मागील वर्षी बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक ९६.०१ टक्के होते.गेल्या वर्षी एकूण 93.73 टक्के मुली व 89.14 टक्के मुलांचे पास होण्याचे प्रमाण होते.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे रोल नंबर व आईचे नाव टाकून पाहता येणार आहे. तसेच SMS वर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी MHHSC ROLL NO टाइप करून 57766 वर पाठवल्यास आपला निकाल मेसेजच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
0 Comments