दिवाळी संकल्प: योगामुळे निरोगी जीवनाचा प्रकाश!
दीपावली... प्रकाशाचा सण!

घराघरात दिवे
पेटतात, पण खरी दिवाळी तेव्हाच उजळते जेव्हा आपल्या अंतर्मनात
आरोग्याचा दिवा पेटतो. घर स्वच्छ करतो, सजवतो, पण आपलं मन आणि
शरीर आपण किती वेळा स्वच्छ, शुद्ध आणि प्रसन्न ठेवतो?
आजचा सण आपल्याला
सांगतो - “जगाला उजळण्यापूर्वी स्वतःचा दिवा पेटवा!”
आणि तो दिवा
म्हणजेच - योग.
दिवाळी, प्रकाशाचा आणि
आनंदाचा सण! या शुभदिनी आपण नवीन सुरुवात करतो, नवीन संकल्प
करतो. या दिवाळीला आपण एक महत्त्वाचा संकल्प करूया निरोगी जीवनाचा, रोज योगा करण्याचा.
चला तर, योगाचे महत्त्व समजून घेऊया आणि आपल्या जीवनात योगाला एक
अविभाज्य भाग बनवूया.
योग म्हणजे काय?
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर ते शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारे एक प्राचीन विज्ञान आहे. 'योग' हा शब्द संस्कृतमधील 'युज' या धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ 'जोडणे' किंवा 'एकत्रित करणे' असा होतो. पतंजली ऋषींनी त्यांच्या 'योगसूत्रां'मध्ये योगाची व्याख्या 'योगश्चित्तवृत्तिनिरोधः' अशी केली आहे, म्हणजेच "मनातील वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग."
योगाचं शास्त्र : शरीर, श्वास आणि विचार योग तीन स्तरांवर काम करतो
शरीरावर
योगासनांमुळे
स्नायू लवचिक होतात, रक्ताभिसरण सुधारतं, पचन क्रिया मजबूत
होते.प्रत्येक आसन आपल्याला सांगतं “शरीर ही देवाची
मूर्ती आहे, ती स्वच्छ ठेवा.”
श्वासावर
प्राणायाम हा
योगाचा आत्मा आहे.श्वास नीट घेतल्यावर मन आपोआप स्थिर होतं.
दीपावलीचा दिवा
जसा स्थिर जळतो, तसंच मन श्वासावर नियंत्रण मिळवून शांत होतं.
विचारांवर
ध्यान म्हणजे आत्मप्रकाश.ध्यानात बसल्यावर आपल्याला आपली खरी शक्ती जाणवते. तेव्हा शरीर, मन आणि आत्मा हे तिघं एकत्र येतात आणि आपण म्हणतो - “मी पूर्ण आहे!”
आधुनिक जगात
योगाचं महत्त्व
आता आपण तणाव, चिंता, डिप्रेशन, अनिद्रा, थकवा या सर्वांचा
सामना करतो.औषधं देतात तात्पुरता आराम, पण योग देतो
आयुष्यभराचं संतुलन.
योग आपल्याला
शिकवतो,
“प्रतिक्रिया देऊ
नका, निरीक्षण करा.”
“अति विचार करू
नका, शांत श्वास घ्या.”
आजच्या गडबडीच्या युगात योग म्हणजे मनाचं ब्रेक सिस्टम आहे.जसं गाडीला ब्रेक लागले नाहीत तर अपघात होतो, तसंच मनावर नियंत्रण नसेल तर आयुष्य घसरतं.योग त्या मनाला स्थैर्य देतो.
दिवाळीचा खास
संकल्प
चला या दिवाळीत
आपण सगळे मिळून एक दीप प्रज्वलित करू -
स्वतःच्या आतला दिवा.
आपण घेऊ या वचन
1️रोज सकाळी १५
मिनिटं सूर्यनमस्कार
2️रोज संध्याकाळी
१० मिनिटं ध्यान
3️आठवड्यातून एक
दिवस परिवारासोबत योग सत्र
4️आणि दररोज एक
नवीन सकारात्मक विचार
असं केल्यावर ही दिवाळी फक्त बाहेरची नाही, आतलीही उजळेल.
Yoga म्हणजे उत्सव!
योग म्हणजे ‘स्वतःकडे परतणं’.शरीराचं ऐकणं, मनाला विश्रांती
देणं, आणि आत्म्याला स्पर्श करणं.योगाचं सौंदर्य असं आहे की, कोणत्याही वयात, कोणत्याही स्थळी, कोणत्याही
अवस्थेत आपण त्याचं पालन करू शकतो.
योग म्हणजे धर्म
नाही, एक शास्त्र आहे.
योग म्हणजे
परंपरा नाही, एक क्रांती आहे.
योग म्हणजे
मर्यादा नाही, एक मुक्तता आहे.
दीपावलीचा अर्थ
फक्त बाहेरचा प्रकाश नव्हे, तर आतली जागृती.आणि ही जागृती निर्माण
करते - योग.
म्हणून चला, या दिवाळीत घ्या
एक नवीन संकल्प,
🌞 “रोजचा दिवस सुरू
होईल योगाने,आणि संपेल हसत, आनंदाने!”
दिवाळीचा खरा
अर्थ आहे नवीन सुरुवात.या वेळी नवीन
कपड्यांपेक्षा, नवीन वस्तूंपेक्षा महत्त्वाचं आहे - नवीन आरोग्याचा संकल्प. चला म्हणू या
एकत्र,
“मी निरोगी होईन, रोज योग करीन, शरीर,
मन आणि आत्मा
यांचं एकत्व साधीन!”
कारण…
योग म्हणजे दीपावलीचाच दुसरा रूप. तो आपल्या आतल्या अंधारावर विजय मिळवतो, आणि आत्म्याचा दिवा उजळतो.
🏆 “Yoga
KBC Challenge” सुरू झाला आहे!
संकल्प घेतलात ना? आता त्याची
परीक्षा द्या! 👉 खाली दिलेली “KBC YOGA
Challenge Test” सोडवा, 👉 योग्य उत्तरे
देऊन मिळवा तुमचा “KBC YOGA Master Certificate” 👉 आणि बना “ज्ञान योद्धा – योग योद्धा!”
ही परीक्षा फक्त ज्ञानाची नाही, तर स्वतःला ओळखण्याची. प्रत्येक प्रश्न तुम्हाला तुमच्या जीवनातील एका आरशात डोकावायला लावेल. प्रत्येक उत्तर तुम्हाला आतून प्रफुल्लित करेल!
🎇 “ही दिवाळी तुमच्या
आयुष्यात केवळ प्रकाश नव्हे,
🎇आरोग्य, शांतता आणि
प्रफुल्लित चेतना घेऊन येवो.” 🎇
0 Comments