Top Updates

6/recent/ticker-posts

दहावीचा निकाल (SSC RESULT) सोमवारी होणार जाहीर

 दहावीचा निकाल 
(SSC RESULT)


  बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रतीक्षा आहे ती १०वी च्या निकालाची.16 लाखांहून अधिक विद्यार्थी व पालक बोर्डाच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष्य लागले होते.याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून खालील तारीख सांगितली आहे.

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल 27 मे 2024 सोमवार रोजी दुपारी 1वाजता अधिकृत वेबसाइट- https://mahresult.nic.in/sscmarch2024/sscmarch2024.htm  

वर प्रसिद्ध केला जाणार आहे.

  दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या दरम्यान घेण्यात आली होती. यावर्षी 16 लाख 9 हजार 444 विध्यार्थी परीक्षेला बसले होते.या सर्व विद्यार्थ्यांची व पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

  मागील  वर्षी 10वी 2023 चा निकाल 2 जून रोजी जाहीर केला होता.मागील वर्षी १०वी च्या एकूण 15,77,256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.मागील वर्षीची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 93.83 इतकी होती.

महाराष्ट्र एसएससी २०२४ चा निकाल अधिकृत वेबसाइटवर कसा पहायचा

स्टेप1: https://mahresult.nic.in/sscmarch2024/sscmarch2024.htm   अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, ‘एसएससी परीक्षा निकाल २०२४

       (SSC Result २०२४) वर क्लिक करा

स्टेप 3: आपली माहिती भरून लॉगिन करा.

स्टेप 4: परिणाम प्रदर्शन स्क्रीनवर दिसून येईल.

स्टेप 5: आपला निकाल डाउनलोड करा आणि आवश्यक असल्यास प्रिंट आउट घ्या.

Post a Comment

0 Comments