हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट
High Security Registration Plate - HSRP

या ब्लॉगमध्ये, आपण HSRP म्हणजे काय, त्याचे फायदे, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर सर्व आवश्यक बाबींबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (High Security Registration Plate) भारतात वाहन सुरक्षेसाठी सरकारने अनिवार्य केलेली ही एक विशेष प्रकारची HSRP नंबर प्लेट आहे.वाहनधारकांसाठी केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्यानुसार,१ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्व वाहनांना आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि एकसमान ओळख पटवण्यासाठी सुरू केलेली एक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (High Security Registration Plate) विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे.पूर्वीच्या साध्या प्लेटऐवजी या प्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असतात ज्यामुळे नंबर प्लेट बनावट करता येत नाही.वाहनांची वाढती चोरी आणि गैरवापर रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.चोरी झाल्यास वाहन सहज शोधता येते आणि देशभर वाहनांचा एकसारखा डेटा उपलब्ध राहतो.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट,
High Security Registration Plate (HSRP) म्हणजे काय?
HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (High Security Registration Plate) ही ॲल्युमिनियमपासून बनवलेली एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे.HSRP ला अनेक आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत, ज्यामुळे ती सामान्य नंबर प्लेटपेक्षा खूप वेगळी आहे.या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) प्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असतात ज्यामुळे नंबर प्लेट बनावट करता येत नाही.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) चे महत्त्व.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) लावण्याचे अनेक फायदे आहेत, जे केवळ कायदेशीर बंधन नसून तुमच्या वाहनाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहेत.
वाहन ओळख: हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) मुळे वाहनाची अचूक माहिती मिळते. प्रत्येक प्लेटला एक युनिक लेझर-कोडेड क्रमांक असतो जो वाहनाच्या चेसिस आणि इंजिन क्रमांकाशी जोडलेला असतो.यामुळे, पोलिसांना आणि परिवहन विभागाला वाहनाची माहिती लगेच तपासता येते.या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) प्लेटमुळे वाहनाची ओळख पटवणे आणि ट्रॅक करणे सोपे होते.
चोरी न होण्यासाठी मदत:
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) मध्ये असलेले विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये जसे की होलोग्राम, लेझर-ब्रँडेड क्रमांक आणि स्नॅप लॉक, बनावट नंबर प्लेट बनवणे जवळपास अशक्य करतात. त्यामुळे, चोरी झालेल्या गाड्यांची ओळख पटवणे सोपे होते आणि गुन्हेगार अशा गाड्यांचा वापर करण्यापासून परावृत्त होतात.हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) प्लेट बदलता येत नसल्यामुळे चोरीच्या वाहनांचा गैरवापर करणे कठीण होते.
अपघात आणि गुन्ह्यांमध्ये उपयोगी :
जर एखादे वाहन अपघात करून पळून गेले किंवा एखाद्या गुन्ह्यात त्याचा वापर झाला, तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) मुळे त्या वाहनाचा मागोवा घेणे सोपे होते.वाहतुकीतील अपघात, गुन्हे, दहशतवाद यामध्ये वापरलेली वाहने पटकन शोधता येतात.अपघात झाल्यास QR कोड स्कॅन करून वाहन मालकाची माहिती त्वरीत मिळू शकते व त्यामुळे जखमींना मदत पोहोचवणे सोपे होते.
देशभर एकसारखी नोंदणी प्रणाली :
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) मुळे देशभरातील सर्व वाहनांसाठी एकसमान नंबर प्लेट प्रणाली तयार झाली आहे. यामुळे, राज्यांच्या सीमा पार करताना वाहनांची ओळख पटवणे सोपे होते.वाहनाची सर्व माहिती ऑनलाइन नोंदवली जात असल्यामुळे तपशील सुरक्षित राहतो.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट,
High Security Registration Plate (HSRP) ची प्रमुख वैशिष्ट्ये.
क्रोमियम-आधारित होलोग्राम:
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) प्लेटच्या डाव्या बाजूला निळ्या रंगाचा अशोक चक्राचा होलोग्राम असतो, जो हॉट-स्टॅम्पिंग तंत्रज्ञानाने लावलेला असतो.हा होलोग्राम बनावट प्लेट ओळखण्यास मदत करतो.
युनिक लेझर-कोडेड (Laser Etched Code) क्रमांक:
प्रत्येक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) प्लेट वर एक 10-अंकी युनिक लेझर-कोडेड क्रमांक असतो. हा क्रमांक स्कॅन करून वाहनाची संपूर्ण माहिती मिळू शकते.या १०-अंकी युनिक लेझर कोड मुळे प्रत्येक वाहनाची स्वतंत्र ओळख निर्माण होते.
नॉन-रिमूवेबल स्नॅप लॉक:
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) ला वाहनावर बसवण्यासाठी खास प्रकारचे नॉन-रिझ्युमेबल स्नॅप लॉक वापरले जातात, ज्यामुळे एकदा फिट केल्यानंतर ते पुन्हा काढता येत नाहीत. जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केल्यास ते तुटतात.
'IND' अक्षर ब्लू कोड:
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) प्लेटच्या डाव्या बाजूला निळ्या रंगात भारताचा राष्ट्रीय चिन्ह (IND) असतो.प्लेटवर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार 'IND' (India) हे अक्षर छापलेले असते.
अॅल्युमिनियम प्लेट:
स्टील किंवा इतर मटेरियलऐवजी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) ही प्लेट टिकाऊ अॅल्युमिनियमची बनवलेली असते.
रिफ्लेक्टिव्ह फिल्म:हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट:
High Security Registration Plate (HSRP) या प्लेटवर एक विशेष प्रकारची रिफ्लेक्टिव्ह फिल्म लावलेली असते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशातही प्लेट स्पष्ट दिसते.
रजिस्ट्रेशन मार्क (स्टिकर):
चारचाकी वाहनांसाठी गाडीच्या पुढील काचेवर आतून एक स्टिकर लावले जाते, ज्यावर रजिस्ट्रेशन नंबर आणि इतर माहिती असते.
HSRP कोणासाठी बंधनकारक आहे?
सर्व नवीन वाहने कार, दुचाकी, तिनचाकी, व्यावसायिक वाहने इ. साठी.
जुनी वाहने 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेली यांनाही आता HSRP लावणे बंधनकारक आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) मिळवण्याची प्रक्रिया.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) मिळवण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा स्थानिक वाहन नोंदणी कार्यालयात (RTO) अर्ज करू शकता.
ऑफलाइन :
आपल्या वाहनाच्या नोंदणी राज्यातील अधिकृत HSRP विक्रेता/डीलर कडे किंवा RTO कडे अर्ज करू शकता .
महाराष्ट्रामध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट,
High Security Registration Plate (HSRP) साठी
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
.png)
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरबसल्या यासाठी अर्ज करू शकता.
अनेक राज्यांनी HSRP साठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुरु केली आहे.संबंधित राज्याच्या परिवहन विभागाच्या अधिकृत www.bookmyhsrp.com वेबसाइटवर जाऊन तुमच्या वाहनाचा प्रकार, नोंदणी क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरून अर्ज भरू शकता.यासाठी वाहन क्रमांक, इंजिन नंबर, चेसिस नंबर भरून स्लॉट बुक करावा.पेमेंट ऑनलाइन करावे.बुक केलेल्या तारखेला वाहनासोबत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP)बसवून दिली जाते.
आवश्यक कागदपत्रे:अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) साठी अर्ज करताना तुमच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC), सुरु असलेला मोबाईल आवश्यक आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट,
High Security Registration Plate (HSRP)
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:
महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत www.bookmyhsrp.com वेबसाइटला भेट द्या.
'Apply HSRP' किंवा 'Order HSRP' या पर्यायावर क्लिक करा.
वाहनाचा नोंदणी क्रमांक, चेस नंबर शेवटचे ५ आकडे आणि इंजिन नंबर शेवटचे ५ आकडे अचूकपणे टाका.
सोयीनुसार जवळचे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) फिटमेंट सेंटर आणि उपलब्ध वेळ निवडा.
ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे निर्धारित शुल्क अदा करा.
पेमेंट पूर्ण झाल्यावर अर्जाची पावती डाउनलोड करा आणि तिची पुढील प्रक्रियेसाठी प्रिंट काढून घ्या.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) अर्जाची स्थिती Status कसे चेक करावे?
तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासू शकता.www.bookmyhsrp.com या वेबसाइटवर "Track Your Order" या पर्यायावर क्लिक करून,ऑर्डर नंबर आणि वाहन नोंदणी क्रमांक टाकून अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता.
HSRP साठी किती शुल्क भरावे लागते?
वाहनाच्या प्रकारानुसार HSRP साठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. अंदाजित दर खालीलप्रमाणे आहेत:
दुचाकी: साधारण ₹४०० – ₹६००
तीन चाकी: साधारण ₹५०० – ₹७००
चारचाकी: साधारण ₹८०० – ₹१५००
व्यावसायिक वाहने: ₹१२०० – ₹२०००
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) न लावल्यास होणार दंड ?
निर्धारित मुदतीत ३० नोव्हेंबर २०२५ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) नंबर प्लेट न बसवल्यास वाहनधारकांना मोटार वाहन कायद्यानुसार ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वेळेत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) बसवून घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
वाहनधारकांच्या सोयीसाठी सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, High Security Registration Plate (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. १ डिसेंबर २०२५ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
0 Comments